शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 13:34 IST

ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.

खेड : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सरकार चालवत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याला साथ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब थोरात आणि त्यांचा काँग्रेस पक्ष करत आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे व्यक्त केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच सरकार चालवत आहे, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी आम्ही सगळे सरकार चालवत असल्याचे सांगितले. खेड येथील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. २८ मार्च) खेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याची आढावा बैठकही घेतली. या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतातयावेळी यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण केले. ते म्हणाले की, एजन्सी ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करते. यशवंत जाधव यांनीच उत्तर दिले आहे की, मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो. बरेचजण आपल्या आईला मातोश्री म्हणतात. काहीजण आई म्हणतात, तर काहीजण मातोश्री म्हणतात. ते स्वत:च म्हणतात, मग त्याला पुन्हा पुन्हा अधिक उकळी का देता, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.ज्यांना उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतातआमदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेलाही, उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ज्यांना कोणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. असल्या गोष्टीला जास्तीचे महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद झाला पाहिजे की, इथे येऊन आज इतके झटझट निर्णय घेतले आहेत. तीन ते चार सचिवांशी बोलून सूचना दिलेल्या आहेत. त्याला महत्त्व देऊ, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

यातून काय साध्य होणार

ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला.ज्याचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशा विधानांना आम्ही उत्तर देऊ, त्यांच्या विधानाला फार महत्त्व देण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले. '

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAjit Pawarअजित पवारYashwant Jadhavयशवंत जाधव