गांजासह प्रौढाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:21+5:302021-08-13T04:36:21+5:30

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस येथे काही दिवसांपू्र्वी गांजा पकडण्यात आला असतानाच बुधवारी एमआयडीसी येथील रेल्वे क्वॉर्टर्सच्या भिमाया ...

Adult arrested with marijuana | गांजासह प्रौढाला अटक

गांजासह प्रौढाला अटक

Next

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस येथे काही दिवसांपू्र्वी गांजा पकडण्यात आला असतानाच बुधवारी एमआयडीसी येथील रेल्वे क्वॉर्टर्सच्या भिमाया इमारतीसमोर गांजा बाळगल्याप्रकरणी प्रौढाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २५० रुपयांचा गांजा, रोख ८०० रुपये आणि ३ हजार रुपयांचा मोबाइल, असा एकूण ४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.५५ वाजता करण्यात आली.

पाेलिसांनी अशरफ ऊर्फ अडऱ्या महामूद शेख (४९, रा. खान काॅम्प्लेक्स, रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली. बुधवारी सायंकाळी एमआयडीसी येथील रेल्वे क्वॉर्टर्सच्या भिमाया इमारतीजवळ एक जण गांजा घेऊन असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पाेलिसांनी घटनास्थळी छापा टाकून अशरफ याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ पाेलिसांना गांजा आढळला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत.

Web Title: Adult arrested with marijuana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.