राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:16 PM2020-11-09T18:16:56+5:302020-11-09T18:19:11+5:30

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

Adequate funds for dam repairs in the state: Information by Jayant Patil | राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

Next
ठळक मुद्दे धरणांचे ऑडिट होणार, तिवरे धरणफुटी आणि दुरूस्तीच्या प्रश्नाची घेतली गंभीर दखलपुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी देण्याची मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

चिपळूण : तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद कार्यक्रम सावर्डे येथे आयोजित केला होता. यानिमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी माजी आमदार कै. निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, तिवरे धरणफुटीचा चौकशी अहवाल जलसंधारण खात्याच्या अखत्यारित येतो. मात्र, या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर राज्यात सर्वच धरणांचे ऑडिट केले जात आहे. त्यामध्ये अति गळती आढळल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना केली जात आहे.

अर्णव गोस्वामी प्रकरणी ते म्हणाले की, त्याचा सरकारच्या इमेजवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. पीडित कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, शुभदा जोशी, शौकत मुकादम, बाबाजी जाधव उपस्थित होते.

भाजपला टोला

अर्णब गोस्वामी प्रकरणात दोघांनी आत्महत्या केली असून, अशा विषयात त्या पीडित कुटुंबियांवर अन्याय व्हावा, असे कोणालाही अपेक्षित नाही. पण भाजपने हे प्रकरण समोर ठेवून आवाज उठवला तर त्यात काही विशेष नाही. कारण भाजपने तळागाळातील लोकांसाठी कधीही आवाज उठवलेला नाही, अशा मोजक्या शब्दात जयंत पाटील यांनी भाजपला टोला मारला.

Web Title: Adequate funds for dam repairs in the state: Information by Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.