कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात; गाडी ४०० फुट दरीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 15:28 IST2022-03-10T15:23:58+5:302022-03-10T15:28:32+5:30
साखरपा पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघात स्थळी रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे.

कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात; गाडी ४०० फुट दरीत कोसळली
रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकी गाडी ४०० फुट दरीत कोसळल्याची माहिती मिळत असून गाडीतील अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. साखरपा पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघात स्थळी रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे.