Accident: दोन दुचाकींच्या धडकेत काळबादेवी येथील युवकाचा मृत्यू  

By अरुण आडिवरेकर | Updated: October 23, 2022 22:56 IST2022-10-23T22:55:43+5:302022-10-23T22:56:21+5:30

Accident: दुचाकीने हूल दिल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीचा मृत्यू झाला. हा अपघात रत्नागिरी - पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास झाला.

Accident: A youth from Kalbadevi died in a collision between two bikes | Accident: दोन दुचाकींच्या धडकेत काळबादेवी येथील युवकाचा मृत्यू  

Accident: दोन दुचाकींच्या धडकेत काळबादेवी येथील युवकाचा मृत्यू  

रत्नागिरी : दुचाकीने हूल दिल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीचा मृत्यू झाला. हा अपघातरत्नागिरी - पावस मार्गावरील फिनोलेक्सफाटा येथे रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. स्मितेश दिलीप जोशी (२८, काळबादेवी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

स्मितेश दिलीप जोशी हा आपला मित्र प्रसाद सुधीर राऊळ ( २५) यांच्यासोबत पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. यावेळी बासीन रहीम भट्टीवाले (२४) हा रत्नागिरीतून गावखडी येथील आपल्या गावी जात होता. रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिनोलेक्स कंपनी फाटा येथे एका तिसऱ्या दुचाकीस्वाराने हूल दिली. त्यामुळे स्मितेश जोशी व बासीन भट्टीवाले या दोघांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्मितेश दिलीप जोशी याचा जागीच मृत्यू झाला. तर बाशिंग भट्टीवाले, प्रसाद राहुल हे गंभीर जखमी झाले आहेत. 

तिघांनाही तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तपासणी केल्यानंतर स्मितेश दिलीप जोशी याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

स्मितेश जोशी हा मूळचा काळाबादेवी येथील असून, सध्या उद्यमनगर येथे राहत होता. मुंबई येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेला स्मितेश दिवाळी सणासाठी दोन दिवसापूर्वी आपल्या गावी काळबादेवी येथे आला होता. पेशाने इंजिनियर असलेला स्मितेश मुंबईतून परदेशात नोकरीसाठी जाणार होता. परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला. स्मितेशच्या मृत्यूचे वृत्त काळबादेवी परिसरात पसरतात नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. तर या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पूर्णगड पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही पूर्णगड पोलीस स्थानकात सुरू होती.

Web Title: Accident: A youth from Kalbadevi died in a collision between two bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.