Chiplun Flood: “तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:42 PM2021-07-29T15:42:18+5:302021-07-29T15:43:01+5:30

Chiplun Flood: पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेल्या आदित्य ठाकरे यांच्याशी काही चिपळूणकरांनी वाद घातल्याचे म्हटले जात आहे. 

aaditya thackeray visited chiplun and review aid after flood situation | Chiplun Flood: “तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

Chiplun Flood: “तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

Next

चिपळूण: राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यावेळी तुम्ही पर्यावरणमंत्री आहात, कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का, अशी विचारणा आपले सर्वस्व गमावलेल्या संतप्त चिपळूणकरांनी केली आहे. (aaditya thackeray visited chiplun and review aid after flood situation)

“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”

पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. आदित्य यांनी चिपळूणमधील चिमुकल्यांशीही संवाद साधला. यावेळी काही चिपळूणकरांनी आदित्य ठाकरे यांच्याशी वाद घातल्याचे म्हटले जात आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?

तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, कोकणात काय चालले आहे, तेथील परिस्थिती काय आहे? हे पाहायला तुम्ही येत नाही. तुम्ही कधीतरी येता, महिन्यातून एक फेरी तरी होते का तुमची? इथे आमच्या भागातील पूल वाहून गेलेत, अशी कैफियत मांडली. यावेळी पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

“मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

मदतकार्याला सुरुवात झाली आहे 

चिपळूण आणि महाड या दोन्ही तालुक्यात आता पाहणी नाही तर मदतीचे काम सुरु झाले आहे. पहिल्या दिवसापासून आमच्या आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, सेवाभावी संस्था आदींनी रेस्क्यूमध्ये खूप काम केले आहे. अजूनही काही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मदत सुरू करण्यात आली आहे. आम्ही शिवसेना म्हणून जी मदत करायची आहे ती करत आहोत. अन्य पक्षही मदत करत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

आता लसींचे दर वाढले; कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे नवे दर जाणून घ्या

दरम्यान, ही वेळ पक्षीय राजकारण बाजूला ठेवायची आहे. आपण सगळे मिळून लोकांसाठीच काही करत आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यावर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. मात्र, आता सुरुवातीच्या काळात आरोग्य तपासणी, घरगुती सामान, स्थलांतर आदी गोष्टी आम्ही करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 
 

Web Title: aaditya thackeray visited chiplun and review aid after flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app