Accident: वांझोळे नजीक अपघातात लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:49 IST2022-05-06T15:45:33+5:302022-05-06T15:49:52+5:30
देवरुख : एका वळणावर खासगी लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास देवरुख ...

Accident: वांझोळे नजीक अपघातात लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
देवरुख : एका वळणावर खासगी लक्झरी बस खाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास देवरुख साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडला. रवींद्र शिवराम शिवगण (वय-४५) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार, 'माचाळची राणी भैरी भवानी ट्रॅव्हल्स' नंबर (एमएच ०४ जीपी १२९९) ही मुंबईहून साखरप्याच्या दिशेने जात होती. तर वांझोळे गावातील रवींद्र शिवगण हा तरुण देवरुखला कामाला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाला होता. दरम्यान, रिक्षाला ओव्हरटेक करताना लक्झरी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रॅव्हल्स चालकावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.