रत्नागिरी जिल्ह्यात सदस्यांसाठी ११, तर नगराध्यक्षांसाठी २ उमेदवारी अर्ज; आतापर्यंत एकूण किती अर्ज आले.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:34 IST2025-11-15T15:34:16+5:302025-11-15T15:34:31+5:30
Local Body Election: तीन ठिकाणी एकही अर्ज दाखल नाही

रत्नागिरी जिल्ह्यात सदस्यांसाठी ११, तर नगराध्यक्षांसाठी २ उमेदवारी अर्ज; आतापर्यंत एकूण किती अर्ज आले.. वाचा
रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी चार नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींच्या सदस्यांच्या जागेसाठी ११ अर्ज आणि नगराध्यक्ष पदासाठी २ अर्ज असे एकूण १३ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण २३ अर्ज दाखल झाले. यात नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि सदस्यांच्या जागेसाठी १८ अर्ज आले आहेत.
सदस्यांच्या जागांसाठी शुक्रवारी (दि. १४) रत्नागिरी आणि चिपळूण येथे प्रत्येकी १, खेडमध्ये ४ आणि लांजामध्ये ५ असे ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले. राजापूर नगर परिषद आणि देवरूख व गुहागरात एकही अर्ज दाखल झालेला नाही. तर नगराध्यक्षाच्या जागेसाठी चिपळूण आणि गुहागरमध्ये प्रत्येकी एक असे एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ अर्ज आले आहेत. यात सदस्यांच्या जागांसाठी १८ अर्ज आले आहेत. रत्नागिरी ३, चिपळूण आणि खेड प्रत्येकी ४ राजापूर आणि देवरूख प्रत्येकी १ आणि लांजात ५ अर्ज आले आहेत. गुहागरात आतापर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत ५ उमेदवारी अर्ज आले आहेत. यात चिपळूण २, खेड, राजापूर, गुहागर प्रत्येकी १ अशा ५ अर्जांचा समावेश आहे. रत्नागिरी, देवरूख आणि लांजामध्ये एकही अर्ज आलेला नाही.
पाच दिवसांत आलेले अर्ज
तालुका - न. प. सदस्य - नगराध्यक्ष
रत्नागिरी - ३ - ०
चिपळूण - ४ - २
खेड - ४ - १
राजापूर - १ - १
गुहागर - ० - १
देवरूख - १ - ०
लांजा- ५ - ०
एकूण - १८ - ५