Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टॅंकर उलटला
By अरुण आडिवरेकर | Updated: May 2, 2025 17:25 IST2025-05-02T17:20:21+5:302025-05-02T17:25:22+5:30
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील निवळी घाटात सीएनजी गॅस घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी घडली. ...

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टॅंकर उलटला
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील निवळी घाटात सीएनजी गॅस घेऊन जाणारा टँकर उलटल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी घडली. टॅंकर उलटल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असून, अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले आहे.
जयगड येथून सीएनजी गॅस घेऊन हा टॅंकर मुंबईतून येत होता. महामार्गावरील निवळी घाटात हा टॅंकर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि टॅंकर महामार्गाच्या बाजूला उलटला. टँकर उलटल्याने महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे.
अपघाताची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. सुदैवाने या टॅंकरमधील गॅस गळती न झालेली नाही.