शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला, 'महावितरण'चा अनागोंदी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 15:02 IST

विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.

रत्नागिरी : माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळल्याची घटना घडली. विद्युत खांब बसच्या बॉनेटवर पडला. त्यामुळे सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती सर्वत्र पसरताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर महावितरणचा अनागोंदी कारभार समोर आला.माध्यमिक विद्यामंदिर, नाणीज येथे शिक्षणासाठी नांदिवली (ता. लांजा) भागातून विद्यार्थी येतात. नांदिवली येथून नाणीज येथे दररोज शाळेची बस क्रमांक (एमएच-०८-एपी-१२८६) मधून विद्यार्थी वाहतूक केली जाते. दरम्यान रोडवरील बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेली कित्येक दिवस धोकादायक स्थितीत होता. पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. तेच आज विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले असते.दैव बलवत्तर म्हणून गाडीच्या पुढच्या भागावर हा खांब आदळला त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.  चालक प्रशांत पांचाळ यांनी  प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर स्थानिक मदतीला धावून आले. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस वर खांब कोसळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर तरी महावितरणने रस्त्याच्या जवळील, तसेच गावातील धोकादायक विजेचे खांब हटवावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. जोराच्या पावसामुळे, वाऱ्यामुळे धोकादायक स्थितीतील खांब कोसळण्याच्या घटना घडत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी