शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लाईफ जॅकेट असूनही बुडाला; गणपतीपुळेत बोटीवरून पडून कोल्हापुरातील पर्यटकाचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:55 IST

कुटुंबाच्या डाेळ्यांसमाेरच मृत्यू

गणपतीपुळे : ड्रॅगन बाेटीवरून सफारी करताना समुद्रातील माेठ्या लाटेने दिलेल्या धडकेत हात सुटून समुद्रात पडलेल्या काेल्हापुरातील प्राैढाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे घडली. सुरेश जेटानंद गेवराणी (४९, रा. ताराबाई पार्क, कापसेमाळ, काेल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.सुरेश जेटानंद गेवराणी व त्यांचे कुटुंब गणपतीपुळे येथे गुरुवारी दुपारी पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी आले होते. त्यांनी गणपतीपुळे समुद्रात आंघोळीचा आनंद घेत हाेते. त्याचवेळी ड्रॅगन बोटीचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता, ड्रॅगन बोटीला समुद्राच्या एका मोठ्या लाटेने धडक दिली. त्यामुळे त्यांचा हात सुटला आणि ते समुद्रात पडले. त्यांनी सुरक्षिततेसाठी जॅकेट घातले होते. परंतु, तरीही ते पाण्यात बुडू लागल्याचे कळताच बोट व्यावसायिक आणि समुद्र बाहेर असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढले. त्यानंतर संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या रुग्णवाहिकेने त्यांना मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी मधुरा जाधव यांनी प्राथमिक तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित केले. मालगुंड येथे शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने त्यांचे शव जाकादेवी येथे पाठवण्यात आले हाेते. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस करीत आहेत.

कुटुंबाच्या डाेळ्यांसमाेरच मृत्यूसुरेश गेवराणी यांच्यासोबत त्यांची पत्नी, सासू, मुलगा व मुलगी फिरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला. कुटुंबीयांनी डाेळ्यांदेखत सुरेश गेवराणी यांचा मृत्यू पाहिला. त्यामुळे कुटुंबीयांना माेठा धक्का बसला.

लाईफ जॅकेट असूनही बुडालेसुरेश गेवराणी यांनी बाेटीतून सफर करताना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट घातले हाेते. मात्र, ते बाेटीवरून समुद्रात पडले आणि बुडाले. लाईफ जॅकेट असूनही ते कसे बुडाले, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्गkolhapurकोल्हापूरtourismपर्यटनdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू