बालकाला ताप आला, उपचारांसाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:03 IST2025-02-03T14:02:33+5:302025-02-03T14:03:29+5:30
देवरूख : पाच महिन्यांच्या बालकाला ताप आल्याने त्याला उपचारांसाठी काेल्हापूर येथे नेत असतानाचा वाटेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ ...

बालकाला ताप आला, उपचारांसाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला; रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
देवरूख : पाच महिन्यांच्या बालकाला ताप आल्याने त्याला उपचारांसाठी काेल्हापूर येथे नेत असतानाचा वाटेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ जानेवारी राेजी घडली. मयूरेश जनू जांगळी (रा. मुर्शी - भेडींचा माळ, संगमेश्वर) असे बालकाचे नाव आहे.
याबाबत त्याच्या आजाेबांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूरेश याला ताप आल्याने त्याला साखरपा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले हाेते. तेथील डाॅक्टरांनी तपासून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच त्याला काेल्हापूर येथे नेण्यास सांगण्यात आले.
त्याला १०८ रुग्णवाहिकेतून काेल्हापूर येथे नेत असतानाच त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे रुग्णवाहिका पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी देवरूख पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.