शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सी-लिंकच्या पिलर्सला मच्छीमार बोट धडकली, मंडणगडतील बाणकोट-बागमांडला येथे घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:12 IST

अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नसून, बाेटीचे मात्र नुकसान झाले

मंडणगड (जि. रत्नागिरी) : मासेमारी करून परतत असताना मंडणगड तालुक्यातील बाणकोट-बागमांडला सागरी महामार्गावरील पुलाच्या पिलर्सला वाल्मीकीनगर येथील बाेट धडकल्याची घटना गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नसून, बाेटीचे मात्र नुकसान झाले आहे.अपघातग्रस्त बाेट प्रतिभा करवटकर यांच्या मालकीची असून, परमेश्वरी (आयएनडी-एमएच-४-एमएम-४९४१) असे या बाेटीचे नाव आहे. यासंदर्भात बोटचालक अनंत करवटकर यांनी माहिती दिली. त्यानुसार, मासेमारी करून परतत असताना जुना सागरी पुलाच्या दोन पिलर्सच्या मधून नेहमीच्या मार्गाने बोट नेत असताना पिलर्सच्या मधोमध असलेल्या एखाद्या संरचनेला किंवा पाण्यातील अडथळ्याला बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.सध्या जुन्या पुलाच्या बाजूला नवीन सागरी पुलाचे काम सुरू असल्याने पाण्यात काही बांधकाम साहित्य किंवा संरचना असण्याची शक्यता असून, त्या अडथळ्याला धडकून बोटीचे पंखे मोडल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत आम्ही बचावलाे असलाे तरी बाेटीचे माेठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

बाणकोट बागमांडला जुन्या सागरी पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होते. तरीही आम्ही जुन्या सागरी पुलाला इंडिकेटर म्हणून रेडियम किंवा अन्य इंडिकेट होईल अशी व्यवस्था करू. तसेच नवीन पुलाचे काम सुरू असून, त्या कामातून बोटीचे नुकसान होण्याची शक्यता नाही. - अनिरुद्ध बाेर्डे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Fishing boat hits sea-link pillars, accident near Mandangad.

Web Summary : A fishing boat collided with pillars of a bridge near Mandangad, Ratnagiri, while returning from fishing. No casualties were reported, but the boat sustained damage. Investigation is underway to determine the exact cause.