Ratnagiri: सी-लिंकच्या पिलर्सला मच्छीमार बोट धडकली, मंडणगडतील बाणकोट-बागमांडला येथे घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:12 IST2026-03-14T13:11:38+5:302026-03-14T13:12:04+5:30

अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नसून, बाेटीचे मात्र नुकसान झाले

A fishing boat crashed into the pillars of the bridge on the Bankot Baghmandla marine highway in Mandangad taluka | Ratnagiri: सी-लिंकच्या पिलर्सला मच्छीमार बोट धडकली, मंडणगडतील बाणकोट-बागमांडला येथे घडली दुर्घटना

Ratnagiri: सी-लिंकच्या पिलर्सला मच्छीमार बोट धडकली, मंडणगडतील बाणकोट-बागमांडला येथे घडली दुर्घटना

मंडणगड (जि. रत्नागिरी) : मासेमारी करून परतत असताना मंडणगड तालुक्यातील बाणकोट-बागमांडला सागरी महामार्गावरील पुलाच्या पिलर्सला वाल्मीकीनगर येथील बाेट धडकल्याची घटना गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या अपघातात काेणतीही जीवितहानी झालेली नसून, बाेटीचे मात्र नुकसान झाले आहे.

अपघातग्रस्त बाेट प्रतिभा करवटकर यांच्या मालकीची असून, परमेश्वरी (आयएनडी-एमएच-४-एमएम-४९४१) असे या बाेटीचे नाव आहे. यासंदर्भात बोटचालक अनंत करवटकर यांनी माहिती दिली. त्यानुसार, मासेमारी करून परतत असताना जुना सागरी पुलाच्या दोन पिलर्सच्या मधून नेहमीच्या मार्गाने बोट नेत असताना पिलर्सच्या मधोमध असलेल्या एखाद्या संरचनेला किंवा पाण्यातील अडथळ्याला बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या जुन्या पुलाच्या बाजूला नवीन सागरी पुलाचे काम सुरू असल्याने पाण्यात काही बांधकाम साहित्य किंवा संरचना असण्याची शक्यता असून, त्या अडथळ्याला धडकून बोटीचे पंखे मोडल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत आम्ही बचावलाे असलाे तरी बाेटीचे माेठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

बाणकोट बागमांडला जुन्या सागरी पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होते. तरीही आम्ही जुन्या सागरी पुलाला इंडिकेटर म्हणून रेडियम किंवा अन्य इंडिकेट होईल अशी व्यवस्था करू. तसेच नवीन पुलाचे काम सुरू असून, त्या कामातून बोटीचे नुकसान होण्याची शक्यता नाही. - अनिरुद्ध बाेर्डे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

Web Title : रत्नागिरी: मंडणगड के पास समुद्री-लिंक के खंभों से मछली पकड़ने वाली नाव टकराई।

Web Summary : रत्नागिरी के मंडणगड के पास मछली पकड़ने वाली एक नाव पुल के खंभों से टकरा गई। इस घटना में कोई हताहत नहीं हुआ, लेकिन नाव को नुकसान पहुंचा है। दुर्घटना के कारणों की जांच जारी है।

Web Title : Ratnagiri: Fishing boat hits sea-link pillars, accident near Mandangad.

Web Summary : A fishing boat collided with pillars of a bridge near Mandangad, Ratnagiri, while returning from fishing. No casualties were reported, but the boat sustained damage. Investigation is underway to determine the exact cause.