शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: बांधकामाच्या देयकावर सहीसाठी सात हजाराची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:54 IST

उपविभाग कार्यालयातील उपअभियंत्यांच्या दालनात करण्यात आली कारवाई

रत्नागिरी : बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या गुहागरातील बांधकाम उपविभागातील उपअभियंत्याला (वर्ग १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संजय तुळशीराम सळमाखे, असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (१६ डिसेंबर) गुहागरातील जिल्हा परिषदेच्या उपविभाग कार्यालयातील उपअभियंत्यांच्या दालनात करण्यात आली.याप्रकरणी फिर्यादी हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आले हाेते. या देयकावर उपअभियंता यांची स्वाक्षरी आवश्यक हाेती. त्यानुसार, फिर्यादी हे १२ डिसेंबर राेजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी उपअभियंता यांच्या कार्यालयात गेले हाेते.

त्यावेळी त्यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच देयकासाेबत जाेडलेल्या कामांच्या फाेटाेवर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Engineer Caught Red-Handed Accepting Bribe for Construction Bill Signature.

Web Summary : A Ratnagiri sub-engineer was arrested accepting a ₹7,000 bribe for signing a construction bill. The Anti-Corruption Bureau caught Sanjay Salmakhe at his Guhagar office. He demanded the money from a supervisor for signing the bill and photos of the work.