Ratnagiri: बांधकामाच्या देयकावर सहीसाठी सात हजाराची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:54 IST2025-12-17T12:54:23+5:302025-12-17T12:54:42+5:30
उपविभाग कार्यालयातील उपअभियंत्यांच्या दालनात करण्यात आली कारवाई

Ratnagiri: बांधकामाच्या देयकावर सहीसाठी सात हजाराची लाच घेताना उपअभियंता जाळ्यात
रत्नागिरी : बांधकामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी सात हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या गुहागरातील बांधकाम उपविभागातील उपअभियंत्याला (वर्ग १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संजय तुळशीराम सळमाखे, असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (१६ डिसेंबर) गुहागरातील जिल्हा परिषदेच्या उपविभाग कार्यालयातील उपअभियंत्यांच्या दालनात करण्यात आली.
याप्रकरणी फिर्यादी हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम करतात. ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रथम देयक तयार करण्यात आले हाेते. या देयकावर उपअभियंता यांची स्वाक्षरी आवश्यक हाेती. त्यानुसार, फिर्यादी हे १२ डिसेंबर राेजी देयकावर स्वाक्षरी घेण्यासाठी उपअभियंता यांच्या कार्यालयात गेले हाेते.
त्यावेळी त्यांनी देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी तसेच देयकासाेबत जाेडलेल्या कामांच्या फाेटाेवर स्वाक्षरी करण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुहागर पाेलिस स्थानकात उपअभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.