शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गरोदर मातांच्या पोषण आहारात सापडला मृत उंदीर, ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:25 IST

साखरपा : स्तनदा व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पाकिटात मृत सडलेला उंदीर मिळाल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ...

साखरपा : स्तनदा व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पाकिटात मृत सडलेला उंदीर मिळाल्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव मुरधीर आळीतील अंगणवाडीत घडला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.येथील मदतनीस प्राजक्ता सावंत यांनी हा प्रकार कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी यांना कळविला. त्यांनी त्वरित देवरुख गटविकास अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पोषक खाद्य आहार म्हणून या धान्याचे वितरण २० ते २५ महिलांना केले जाते. सोमवारी मुरधीर आळीतील अंगणवाडीत आलेल्या धान्यामध्ये मृत उंदीर सापडला.धामापूर बीटच्या पर्यवेक्षिका व्हटकर व साखरपा बीटच्या पर्यवेक्षिका रोशनी पेजे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या उपस्थित पंचनामा केला. या प्रकारामुळे परिसरात पोषण आहार वाटप थांबविण्यात आले आहे. जर असे प्रकार घडत असतील, तर आम्हाला आहार नको, अशी संतप्त भावना ग्रामस्थ अमित जाधव यांनी व्यक्त केली.लाभार्थ्यांना असा पोषण आहार देण्यापेक्षा त्यांच्या खात्यावर निधी जमा करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकाराला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही लोकांनी यावेळी केली. यावेळी कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी, उपसरपंच श्रद्धा शेट्ये, सदस्या नयना शिंदे, माजी उपसरपंच प्रवीण जोयशी, अमित केतकर, अमित जाधव, योजना लोटनकर, प्राजक्ता सावंत, नयन गोंधळी, ज्योती डंबे, भरत माने, संतोष पोटफोडे उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी