शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लग्न बीडमध्ये, बिंग फुटले रत्नागिरीत; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:35 IST

दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

रत्नागिरी : बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करुन रत्नागिरीत आलेल्या जोडप्याचे बिंग अखेरीस फुटले. तरुणीने घरगुती वादातून झाेपेच्या गाेळ्या घेतल्या आणि तिला जिल्हा शासकीय रुणालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपास केला असता सारा प्रकार समाेर आला. याप्रकरणी शहर पोलिस स्थानकातून झिरो नंबरने बीड येथील पोलिस स्थानकात जोडप्याच्या पालकांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी १८ वर्षे पूर्ण होऊन ५ दिवस झालेल्या विवाहित तरुणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने त्या मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी केली. त्यावेळी तो तरुण २७ वर्षांचा आणि ती तरुणी ५ दिवसांपूर्वीच १८ वर्षे पूर्ण झालेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.तसेच ही तरुणी त्या तरुणाच्या नात्यातीलच असून, त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे त्यांच्या नातेवाइकांनी या दाेघांचे काही महिन्यांपूर्वी बीड येथे लग्न लावून दिले होते. त्यानंतर नोकरीनिमित्त हे विवाहित जोडपे रत्नागिरीत आले होते. या दोघांमध्ये काही कारणातून वाद झाल्याने त्या तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, बीड येथे अल्पवयीन मुलीशी लग्न करून लपविलेला गुन्हा अखेर या आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पाेलिसांनी जाेडप्याच्या विराेधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस