शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कोकण विभागातील कर्मचाऱ्यांचे ८२.२ टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महावितरणने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोकणातील ८२.२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महावितरणने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोकणातील ८२.२ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना प्रादुभार्वामध्ये सुरळीत वीज पुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीज सेवा देणाऱ्या महावितरणच्या नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून विशेष प्रयत्न सुरु आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यामुळे आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी चांगला फायदा झाला.

महावितरणमध्ये कार्यरत ७५ हजार ३२३पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक बारामती परिमंडलात ९१.२ टक्के लसीकरण झाले आहे. कोकण विभागात ८२.२ टक्के लसीकरण झाले आहे.

आतापर्यंत ४ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या डोससाठी निश्चित केलेल्या मुदतीनुसार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत ग्राहकसेवा द्यावी आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.