Ratnagiri crime: गिफ्ट लागल्याचे सांगून तरुणीला ७८ हजारांचा ऑनलाइन गंडा
By अरुण आडिवरेकर | Updated: March 17, 2023 11:41 IST2023-03-17T11:41:12+5:302023-03-17T11:41:52+5:30
रत्नागिरी : तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला ७८,१८५.९९ रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. सायली शंकर चिपळूणकर (२३, ...

Ratnagiri crime: गिफ्ट लागल्याचे सांगून तरुणीला ७८ हजारांचा ऑनलाइन गंडा
रत्नागिरी : तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला ७८,१८५.९९ रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. सायली शंकर चिपळूणकर (२३, रा. नागावे-शंकरवाडी, ता. चिपळूण) असे तरुणीचे नाव असून, हा प्रकार १४ मार्च राेजी दुपारी २:५५ ते सायंकाळी ५:५४ या वेळेत घडला.
याप्रकरणी रजत अग्रवाल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागावे येथील सायली चिपळूणकर या तरुणीला मंगळवार, १४ मार्च राेजी फाेन आला. फाेनवर हिंदी भाषेतून संभाषण करत ‘‘मी अर्थ कंपनीतून बाेलत आहे. तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर असल्याने तुम्हाला एसी, वन प्लसचा फाेन, लॅपटाॅप, टीव्ही, फ्रीज असे गिफ्ट लागले आहे. त्यातले तुम्हाला काय पाहिजे,’ अशी विचारणा केली.
सायलीने साेनीचा टीव्ही पाहिजे असे सांगताच त्यासाठी तुम्हाला मामा अर्थ कंपनीकडून ४ हजार रुपयांची खरेदी करावी लागेल, असे सांगण्यात आले. खरेदीचे पेमेंट युनियन बॅंकेच्या खात्यावर करा, असेही सांगण्यात आले.
त्यानंतर सायलीने गुगल पे वरून पाचवेळा एकूण ७८,१८५.९९ रुपये ट्रान्स्फर केला. ही रक्कम पाठविल्यानंतर काेणत्याही प्रकारची वस्तू देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायलीने अलाेरे पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.