भरधाव गाडीच्या धडकेने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 19:32 IST2020-11-23T19:29:36+5:302020-11-23T19:32:04+5:30
रस्त्याशेजारी खेळणाऱ्या ६ वर्षीय बालकाला भरधाव जाणाऱ्या ओमनी गाडीची धडक बसून त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बडदवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. अंश अंकुश कानसे असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

भरधाव गाडीच्या धडकेने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू
देवरुख : रस्त्याशेजारी खेळणाऱ्या ६ वर्षीय बालकाला भरधाव जाणाऱ्या ओमनी गाडीची धडक बसून त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बडदवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. अंश अंकुश कानसे असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात सुषमा सुरेंद्र कानसरे यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण प्रभाकर पवार (रा. उजगाव, पवारवाडी) हा ओमनी गाडी (एमएच ०८, एजी ३७७९) ही गाडी घेऊन भरधाव वेगाने पवारवाडी ते बडदवाडी असा जात होता. रविवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान उजगाव बडदवाडी येथे आला असता अंश कानसरे याला धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला प्रथम देवरुखमध्ये व नंतर उपचारासाठी संगमेश्वर येथे दाखल केले असता तो मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.
अपघातास कारणीभूत ठरल्याने प्रवीण पवार यांच्यावर भारतीय दंडविधान क ३०४ (अ),२८९,३३७,३३८ तसेच मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, चालकाला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करीत आहेत.