शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

५१ गावांतील जमिनींचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: October 24, 2015 00:39 IST

इको-सेन्सिटिव्हचा फटका : शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील परिस्थिती

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम घाटातील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ५१ गावांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. याचा परिणाम म्हणून तालुक्यातील आंबा, मलकापूर, गजापूर, करंजफेण, शित्तूर वारुण, आदी गावांतील जमिनींचे संपूर्ण व्यवहार थंड पडले आहेत. जमिनींची खरेदी-विक्री थांबल्याने जमिनी खरेदी करू इच्छिणाऱ्यांची मोठी पंचाईत आली आहे.शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीचा पट्टा व पश्चिम घाटातील ५१ गावांचा इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश झाला आहे. त्यातील काही गावांचा बफर झोन, व्याघ्र प्रकल्पांमध्ये समावेश झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील ५६,८२५ चौरस कि.मी. इतके क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १८४ गावांपैकी शाहूवाडी तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्रात १७.३४० चौरस कि़मी. क्षेत्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले आहे.तालुक्यातील आंबा शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना येथील विकासकामावर इको-सेन्सिटिव्ह झोनचा परिणाम झाला आहे. मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, आदी शहरांतील व्यावसायिकांनी आंबा, मलकापूर, गेळवडे, आदी परिसरात जमिनी खरेदी केल्या आहेत. आंबा येथे मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट, विश्रामगृह, एन. ए. प्लॉट, खरेदी-विक्री सुरू होती. बारा ते पंधरा लाख रुपये एक एकरचा दर सुरू होता. तर एन. ए. प्लॉटचा दर तीन ते चार लाख रुपये सुरू होता. दरम्यान, हा परिसर इको-सेन्सिटिव्ह, बफर झोन, व्याघ्र प्रकल्प, आदी घोषित झाला आहे. त्यामुळे येथील जमीन खरेदी करण्यास व्यावसायिक येत नसल्यामुळे संपूर्ण खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले आहेत. याचा परिणाम येथील हॉटेलवरदेखील झाला आहे. आंबा, चाळणवाडी, तळवडे, चांदोली परिसरातील जमिनीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. मात्र, सध्या आर्थिक मंदीचा फटका या व्यवहाराला बसला आहे. येथील स्थानिकांना छोटी-मोठी कामेदेखील मिळेनाशी झाली आहेत. (प्रतिनिधी)