रत्नागिरी : कुपोषित बालके ही राज्यातील अनेक वर्षांची मोठी समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून सातत्याने पाठपुरावा, वेगवेगळ्या योजना असे उपक्रम राबवले जातात. समाजातील जागृतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण खूप कमी आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४० तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे.जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे वयोगटातील ५१ हजार ७६० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६३४ बालके मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) तर त्यातील ४० बालके तीव्र कुपोषित (सॅम) आहेत. वयानुसार कमी वजनाची ६४८ बालके आढळली आहेत.अति कुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
वेळोवेळी आढावा सुरूजिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून रत्नागिरी जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बालकांचा महिला व बालकल्याण विभाग वेळोवेळी आढावा घेत आहे आणि संबंधितांना पूरक सूचनाही देण्यात येत आहेत.
तालुकानिहाय अति कुपोषित बालकेतालुका - तीव्र कुपोषित बालकेमंडणगड - १३दापोली - ६खेड - १चिपळूण - १गुहागर - १संगमेश्वर - ३रत्नागिरी - ११लांजा - १राजापूर - ३