जालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:39 IST2020-12-08T13:36:49+5:302020-12-08T13:39:14+5:30

Crimenews, Fraud, Police, Ratnagirinews एका महिलेने ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३० लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

30 lakh 73 thousand fraud of a trader from Jalgaon | जालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूक

जालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूक

ठळक मुद्देजालगाव येथील व्यापाऱ्याची ३० लाख ७३ हजाराची फसवणूकदापोली पोलीस स्थानकात विरोधात तक्रार दाखल

दापोली : एका महिलेने ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड कुरियरने पाठवले आहेत. ते कुरियर विमानतळावरून सोडवून घ्या, असे प्रलोभन दाखवून जालगाव येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ३० लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

जालगाव येथील विजय प्रभाकर खोत यांची जानेवारी २० मध्ये अमेलिया जॅक्सन नावाच्या लंडन येथील एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली. फेब्रुवारीमध्ये या महिलेने खोत यांच्या व्हाट्सॲपवर एक पार्सल पाठविले आहे, असा मेसेज केला, पार्सलमध्ये असलेल्या वस्तूंचे फोटोही व्हाट्सॲपवर टाकले. त्यानंतर प्रिया शेठ या महिलेने तुमचे विमानतळावर कुरियर आले आहे.

त्यात फोटोत दाखविलेल्या वस्तू व ९३ लाख रुपये किमतीचे पाउंड आहेत, त्यांनी यासंदर्भात कस्टम व रिझर्व्ह बँक या शासकीय आस्थापना यांची प्रमाणपत्रेही पाठविली होती, ही कागदपत्रे खरी असतील हे गृहीत धरून खोत यांनी त्यांच्याकडे मागणी केली जात होती.

तसे बँकेत पैसे भरले, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने खोत याना दोन एटीम कार्डही पाठवली. या एटीएमद्वारे खोत यांनी २ वेळा पैसेही काढले, या सर्व प्रकारात खोत यांनी तब्बल ३० लाख ७३ हजार १०० रुपये या व्यक्तींनी पाठविलेल्या ई-मेल मध्ये दिलेल्या बँक खात्यात भरणा केले. त्यानंतर खोत याना कुरियर काही आले नाही.

आपली फसवणूक झाल्याचे विजय खोत यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस स्थानकात अमेलिया जॅक्सन, प्रिया शेठ, पूजा शर्मा यांचे विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

Web Title: 30 lakh 73 thousand fraud of a trader from Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.