चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखाचा गंडा, सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध गुन्हा

By संदीप बांद्रे | Published: February 2, 2024 02:05 PM2024-02-02T14:05:54+5:302024-02-02T14:07:31+5:30

चिपळूण : हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ...

3 lakh fraud of a businessman who ordered material for a hotel online, A case has been registered at Chiplun police station | चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखाचा गंडा, सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध गुन्हा

चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखाचा गंडा, सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध गुन्हा

चिपळूण : हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सांगली येथील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध येथील पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

येथील हॉटेल व्यावसायीक सुनिल जनार्दन बक्षी (६७, तुलसी अपार्टमेट, प्रभातरोड मार्कंडी चिपळूण) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. बक्षी यांनी २ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हॉटेलसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी एका अॅप द्ववारे सांगली येथील श्री बालाजी ट्रेडर्स याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली. त्यासाठी टप्या-टप्प्याने २ लाख ७० हजार ७३ रूपये त्यांच्या खात्यात जमा केले. परंतू अनेक दिवस उलटूनही श्री बालाजी ट्रेडर्स कडून कोणत्याही प्रकारचा माल किंवा रक्कम परत केलेली नाही. 

याबाबत तक्रारदार बक्षी यांनी सांगितले की, संबंधीत श्री बालाजी ट्रेडर्स हे सांगली येथील असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात जागेवर त्यांचे काही अस्तीत्व नाही. तसेच त्यांचा जीएसटी क्रमांक देखील बनावट असल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहे.

Web Title: 3 lakh fraud of a businessman who ordered material for a hotel online, A case has been registered at Chiplun police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.