शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील २७ गावे इंटरनेटच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

कामकाज आॅनलाईन : ७४ गावांशी जोडणी यशस्वी

राजापूर : शासनाचा कारभार पारदर्शी राहावा, यासाठी ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तालुक्यातील १०१पैकी ७४ ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा प्राप्त झाली असली तरी २७ ग्रामपंचायतींना अद्याप ही सुविधा मिळालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा पाया ठरवणाऱ्या ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुुरू केले असून, भरघोस निधीही विकासकामांसाठी येत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक ठरावा, यासाठी व तो लोकाभिमुख ठरावा म्हणून शासनाने ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्राने पंचायत राज इन्स्टीट्यूशन अकौंट्स (प्रिया) या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. त्यामुळे गावे इंटरनेटने जोडली गेली.राजापूर तालुक्यात ग्रामपंचायतींचे कामकाज आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू असून, १०१ पैकी ७४ ग्रामपंचायतींना त्याचा लाभ झाला. उर्वरित २७ ग्रामपंचायती अद्याप त्या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये आडवली, आेंगले, चिखलगाव डोंगर, जुवाठी, काजिर्डा व कुडावली, खडीकोळवण, कोळंब, मिठगवाणे, परटवली, पेंडखले, फुफेरे, वडवली, वडदहसोळ, माडबन, मोगरे, पांगरीखुर्द, शेजवली, शिवणे बु., शिवणे खुर्द, तळगाव, ताम्हाणे, वाल्ये, येरडव, झर्ये, मोगरे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीना इंटरनेटची सुविधा केव्हा मिळणार ते निश्चित नाही. त्यामुळे शासनाच्या या लोकाभिमुख अभियानात अडथळे येत आहेत. ज्या ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची सुविध यापूर्वी प्राप्त झाली आहे. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींना स्पीडअभावी इंटरनेट संथगतीने मिळत असल्याने कामकाजादरम्यान व्यत्यय येत आहे. त्यामुळे हे अडथळे कसे दूर करायचे ते मोठे आव्हान आहे. (प्रतिनिधी)