मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, चालकाला डुलकी लागल्याने आराम बस कलंडली, २२ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 09:33 IST2022-04-15T09:32:39+5:302022-04-15T09:33:08+5:30

Accident on Mumbai-Goa Highway: खासगी आराम गाडीच्या चालकाला सकाळी डुलकी लागल्याने आराम बस कलंडल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी नजीक शुक्रवारी घडली. या अपघातात गाडीतील २२ प्रवासी जखमी झाले आहेत.

22 passengers injured in Mumbai-Goa highway accident | मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, चालकाला डुलकी लागल्याने आराम बस कलंडली, २२ प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात, चालकाला डुलकी लागल्याने आराम बस कलंडली, २२ प्रवासी जखमी

खेड -  खासगी आराम गाडीच्या चालकाला सकाळी डुलकी लागल्याने आराम बस कलंडल्याची घटना मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कळंबणी नजीक शुक्रवारी घडली. या अपघातात गाडीतील २२ प्रवासी जखमी झाले आहेत.  जखमी प्रवाशांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

ही गाडी (जमेची ०४, जीपी २३१९) मुंबई- परळ येथून खेड तालुक्यातील  केळणे येथे जात होती. मात्र, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कळंबणी गावानजीक आली असता गाडीच्या चालकाला डुलकी लागली. आणि काही क्षणातच गाडी महामार्ग सोडून रस्त्याच्या कडेला खड्यात कोसळली.

या अपघाताची माहिती मिळताच  खेड येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांना मदत केली. अपघातस्थळी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 22 passengers injured in Mumbai-Goa highway accident