रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 18:48 IST2018-03-27T18:48:43+5:302018-03-27T18:48:43+5:30

रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत.

20 percent water in Ratnagiri and 50 percent watercourse | रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

रत्नागिरीत कागदावर २० टक्के तर प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात

 रत्नागिरी - रत्नागिरी एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना होणाºया पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे कुवारबाव, कर्ला, नाचणे, शिरगाव, मिºया, मिरजोळे या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. २० टक्क्यांची कपात ५० टक्क्यांवर कशी गेली, याबाबत सोमवारी आमदार उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या येथील अधिकाºयांना धारेवर धरले. तसेच कपातीइतकेच पाणी कमी असेल. त्यापेक्षा पाणीकपात चालणार नाही, असा इशाराही अधिकाºयांना यावेळी देण्यात आला. 

एमआयडीसी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना पाणीपुरवठा करीत आहे. यावेळी हरचेरी धरणात पाण्याची उपलब्धता असल्याचे पुढे येत आहे. याठिकाणी फारशी पाणीपातळी घसरलेली नाही. मात्र, असे असतानाही पाणीकपात का केली व कोणाच्या सांगण्यावरून केली, असा प्रश्नही आमदार सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना केला. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे सर्व संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक सोमवारी दुपारी झाली. त्यावेळी सर्व ग्रामपंचायतींनी अपुºया पाणीपुरवठ्याबाबत तक्रार केली. यामुळे ग्रामस्थांना तोंड कसे द्यावे, असा सवालही केला. 

नगर परिषदेला पाणी द्यावे लागत असल्याने ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचे एमआयडीसीकडून ग्रामपंचायतींना सांगण्यात आले. मात्र, नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही वाढ झालेली नसताना ग्रामपंचायत पदाधिकाºयांना असे खोटे का सांगण्यात आले, असा प्रश्न करीत पुरेसा व दिलेल्या वेळेनुसार पाणी पुरवठा न झाल्यास शांत बसणार नाही, असेही सामंत यांनी यावेळी अधिकाºयांना सुनावले. 

एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी, घाटिवळे,  या कोल्हापूर पध्दतीच्या धरण प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता १६.५० दशलक्ष घनमीटर आहे. एमआयडीसीकडून कुवारबावला ६००, कर्ला-२००/३००, नाचणे ३५०/७००, शिरगाव-४५०, मिºया २००, मिरजोळे-६०/७०, रत्नागिरी नगर परिषदेला १५०० घनमीटर पाणी गेल्या काही वर्षांपासून पुरवले जात आहे. त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 

धरणसाठ्यात मोठी घसरण असताना, केलेली पाणीकपात समजण्याजोगी आहे. परंतु, उन्हाळ्यात २० टक्के कपात सांगितल्यानंतर प्रत्यक्षात ५० टक्केपर्यंत पाणीकपात केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मार्च २०१८च्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे ६५ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या हरचेरी, निवसर, असोडे, अंजणारी व घाटिवळे या धरणांमध्येही पाणीसाठा स्थिती नक्कीच चांगली आहे. मात्र, असे असतानाही एमआयडीसीने केलेल्या पाणीकपातीवरून वादळ निर्माण झाले आहे.

Web Title: 20 percent water in Ratnagiri and 50 percent watercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.