शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

परतीसाठी १५८ गाड्या मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:12 AM

सर्वाधिक गाड्या मंगळवारी; ग्रुप बुकिंग केलेल्यांसाठी ६६६ गाड्या सोडण्यात येणार

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने आलेले भाविक आता गणेशविसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. सोमवारी रत्नागिरी विभागातून १५८ गाड्या सोमवारी मुंबईकडे रवाना झाल्या. दि.२४ सप्टेंबर पर्यत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून मंगळवारी सर्वाधिक ६६६ गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत.गौरी गणपतीसाठी मुंबई व उपविभागातून २२२५ गाड्यांमधून भाविक रत्नागिरी जिल्ह्यात आले. आता मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला असून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून ग्रुप बु कींगच्या २४४ गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे.मुंबई व उपनगरातील आगारातून जादा एसटी बसेस जिल्ह्यात आल्या होत्या.रत्नागिरी विभागातून देखील मुंबई, उपनगरांसाठी परतीकरिता जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. सोमवारी मुंबईसाठी ३८, बोरीवली ५०, कल्याण ८, ठाणे २२, भांडुप ७, विठ्ठलवाडी ३, नालासोपारा १०, विरार ३, पुणे १६, मिळून १५७ आरक्षित व एक गु्रप बुकींग अशा एकूण १५८ जादा गाड्या रवाना झाल्या. मंगळवारी कामावर जाण्यासाठी अनेक मंडळींनी आधीच आरक्षण करून ठेवल्याने गौरी गणपतींचे विसर्जन करून लगेचच मुंबईकडे निघाले आहेत.परतीच्या प्रवासासाठी दि. २४ पर्यत नियोजन केले असले तरी सर्वाधिक गाड्या मंगळवार दि. १८ रोजी रवाना होणार आहेत. मुंबईसाठी ११५, परेल ९, बोरीवली १८९, कल्याण २२, ठाणे ६२, भांडुप १७, विठ्ठलवाडी २२, नालासोपारा ४१, भार्इंदर १, विरार ११, पुणे ३२ व इतर २ मिळून ५२३ गाड्यांचे आरक्षण प्रवाशांनी केले आहे.ग्रुप बुकींगसाठी १४३ गाड्यांचे आरक्षण केल्यामुळे एकूण ६६६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.बुधवार दि. १९ रोजी मुंबईसाठी ७५, परेल ३, बोरीवली १२०, कल्याण १०, ठाणे ४०, भांडुप १२, विठ्ठलवाडी १३, नालासोपारा २९, विरार ९, पुणे १८ एकूण ३२९ जादा गाड्यांचे आरक्षण व ग्रुप बुकींगच्या ९८ गाड्यांचे आरक्षण केले असून एकूण ४२७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.सुरुवातीच्या तीन दिवसांत एसटीला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर, दि.२० रोजी ९५, दि.२१ रोजी ११, दि.२२ रोजी ५, दि.२३ रोजी ४ जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. आरक्षण सुरू असून, प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळGanpati Festivalगणेशोत्सव