शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

१२१२ शिक्षक कारभारी मात्र दोन

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

खेडची स्थिती : लेखनिकांवरच शिक्षण विभागाचा भार

खेड : अलीकडे सर्वत्र आलेली आधुनिकता शिक्षण संस्थांमध्येही आली आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही उंचावला असताना कामाचा हा व्याप सांभाळणारे हात मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे कामे वेळेवर होत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. खेड तालुक्यातील शिक्षण विभागातील सर्वच कारभार केवळ दोन लेखनिक सांभाळत असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.खेड तालुक्यातील शिक्षण विभागाकडे सध्या ४६७ शाळा आणि १२१२ शिक्षकांचा कार्यभार आहे. या विभागाकडे शिक्षण विभागाच्या कार्यभारासह शासनाच्या ऐनवेळी निर्माण होणाऱ्या कामांचाही ताण मोठ्या प्रमाणावर आहे़ अशातच वारंवार बदली होत असलेल्या शैक्षणिक धोरणांचा मोठा बोजा या विभागावर पडतो. हा बोजा सांभाळणारे मनुष्यबळ फारच कमी आहे.या कार्यालयाला सहा कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. मात्र, दोन लेखनिकांना शिक्षणविषयक सारी कामे पार पाडावी लागत आहेत. काम अवाढव्य असल्याने दोघा कर्मचाऱ्यांकडून हे काम वेळेवर होत नाही़ तरीही कामाचा हा रेटा हाकण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आटापिटा करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी या विभागात तीन लेखनिक काम करीत होते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी यातील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्याने तो रजेवर आहे़ उर्वरित दोन कर्मचारी हे काम पाहात आहेत़ तालुक्यातील शिक्षकांच्या सेवापुस्तिका भरणे, बदलीनोंद पुस्तक भरणे, गोपनीय अहवाल देणे, वेतनश्रेणी पुस्तके व पगार पुस्तिका भरणे, शिक्षकांचा पगार करणे, शाळांच्या भेटीबाबतचे अहवाल तयार करणे, विविध प्रकारचे रजिस्टर्ड तयार करणे व तशा नोंदी ठेवणे, शिक्षणसेवकांच्या कामाची निश्चिती करणे आदी कामे या दोन कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत़ त्यामुळे अनेक कामांना विलंब होत आहे़ या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मंजूर पदे त्वरित भरावीत, अशी मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)खेडच्या शिक्षण विभागातील प्रकाररिक्त पदांची जंत्री, बोजा वाढलाअपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामे रंगाळलीकार्यालयाला ६ कर्मचाऱ्यांची मंजूरी.कामाचा रेटा पुढे सरकवण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्याचा आटापिटा.दोन वर्षापूर्वी तीन लेखनिक होते कार्यरत.