रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात १२ आरामदायी बसेस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 17:48 IST2025-03-10T17:48:43+5:302025-03-10T17:48:59+5:30

विभागासाठी एकूण ३० गाड्या उपलब्ध होणार

12 buses entered Ratnagiri division, Inauguration in the presence of Guardian Minister Uday Samant | रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात १२ आरामदायी बसेस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत लोकार्पण

रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात १२ आरामदायी बसेस, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत लोकार्पण

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने बीएस ६ प्रणालीच्या नवीन बसेस उपलब्ध केल्या असून, रत्नागिरी विभागात एकूण १२ बसेस रविवारी दाखल झाल्या. रत्नागिरी आगारातील बसेसचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला.

रत्नागिरी विभागासाठी एकूण ३० गाड्या उपलब्ध होणार आहेत. सध्या १२ गाड्या दाखल झाल्या असून, त्यापैकी पाच गाड्या रत्नागिरी आगार, तीन लांजा व चार राजापूर आगारात दाखल झाल्या आहेत. नवीन बसेस टू बाय टू आसनी असून आधुनिक व सीएमव्हीआर दर्जाच्या आहेत. १९७ अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन असून, बस रिअर एअर सस्पेन्शन सुविधा असलेल्या आहेत. या सर्व गाड्या महामंडळाच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत.

रत्नागिरीतील रहाटाघर येथे आयोजित लोकार्पण सोहळ्याचा बहुमान पालकमंत्री सामंत यांनी महिला प्रवाशांना दिला. महिला प्रवाशांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्रचालन अभियंता अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव, रत्नागिरी आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) संदीप पाटील उपस्थित होते. रत्नागिरी विभागातर्फे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पालकमंत्री सामंत यांचे स्वागत केले.

Web Title: 12 buses entered Ratnagiri division, Inauguration in the presence of Guardian Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.