शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी मद्याचा ११ लाख रुपयांचा साठा जप्त

By admin | Updated: June 22, 2014 01:41 IST

उत्पादन शुल्क : रत्नागिरीनजीक पाली येथे धडक कारवाई

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथे शुक्रवारी रात्री एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी मिनी बसमधून बेकायदा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यावेळी मिनीबससह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा आणि रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे अधिकारी मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत होते. शुक्रवारी रात्री या पथकाकडून महामार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पुण्याहून मुंबईकडे जाणारी जान्हवी ट्रॅव्हल्स कंपनीची प्रवासी मिनीबस (एमएच-४८-के-०३१६) ही पालीतील एका धाब्यासमोर आली असता उत्पादन शुल्काच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तिला थांबविले. बस चालकाच्या केबीनसह मागच्या डिकीची तपासणी केली असता त्यामधील १२ बॅगांमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आल. या मद्यसाठ्याचे मालक जतिन हेमंत तांडेल, दिलीप अशोक पारधी व बसचालक शकील सत्तार पटेल या तिघांना मुंबई दारुबंदी अधिनियमाखाली दारुबंदी गुन्ह्यांतर्गत अटक केली. यावेळी मिनीबससह ११ लाख ६ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे दुय्यम निबंधक पी. एस. कांबळे, लांजाचे निरीक्षक दाबेराव, दुय्यम निरीक्षक जितेंद्र पवार, रत्नागिरी ग्रामीणचे दुय्यम निरीक्षक अविनाश घाडगे, विजय हातिसकर, राम पवार, करण घुणावत, शंकर बागेलवाड, वैभव सोनावले, सुरेश शेगर, चक्रपाणी दहीफळे, अनिता डोंगरे, शशिकांत पाटील, मिलिंद माळी यांचा सहभाग होता. (शहर वार्ताहर)