लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 16:49 IST2021-06-26T16:47:34+5:302021-06-26T16:49:16+5:30

liquor ban Ratnagiri : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक बोलेरो पिकअप टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून, या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून, या प्रकरणी बोलेरो टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

11 lakh 62 thousand worth of Goa-made liquor seized at Lotte | लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देलोटे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक बोलेरो पिकअप टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून, या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली असून, या प्रकरणी बोलेरो टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कुंभार्ली घाटात मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीच्या दारूसह सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. कोकण विभागात ही मोठी कारवाई मानली जाते. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अजून अधिकच दक्ष झाले आहे.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, रत्नागिरी जिल्हा प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली खेड व चिपळूण विभागातील निरीक्षक व कर्मचारी यांनी लोटे येथे गोव्याकडून येणाऱ्या २५ रोजी वाहनांची तपासणी मोहीम राबवली. यावेळी या परिसरात गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग खेडचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव यांना एक गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार लोटे एक्सेल फाटा येथे संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बोलेरो पिकअप टेम्पो या वाहनास तपासणीसाठी थांबवले असता त्या टेम्पोच्या मागील हौद्यामध्ये खाकी रंगाच्या पुठयांच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ९२ बॉक्स आढळून आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालक पांडुरंग दयानंद कदम ( रा. वालोपे बेंडकरवाडी, चिपळूण) याच्याकडून गोवा बनावटीची दारू, बोलेरो पिकअप गाडी, मोबाईल असा ११ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक शंकर जाधव तसेच दुय्यम निरीक्षक व्ही. व्ही. सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. बी. भालेकर, जवान ए. के बर्वे तसेच चिपळूण विभागाचे प्रभारी निरीक्षक एस. एन. पाटील, दुय्यम निरीक्षक एन. डी. पाटील, जवान आणि वाहन चालक अतुल वसावे तसेच जवान एस. एन. वड व शेख यांनी केली आहे. अधिक तपास प्रभारी निरीक्षक शंकर जाधव करीत आहेत.
 

Web Title: 11 lakh 62 thousand worth of Goa-made liquor seized at Lotte