नाणीज येथे ट्रक-कार अपघातात १ ठार, ५ जखमी; लग्नासाठी जाताना घडली दुर्घटना

By अरुण आडिवरेकर | Updated: December 2, 2022 18:46 IST2022-12-02T18:46:30+5:302022-12-02T18:46:53+5:30

कारची समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकला जोराची धडक

1 killed, 5 injured in truck car accident near Nanij on Ratnagiri Kolhapur highway | नाणीज येथे ट्रक-कार अपघातात १ ठार, ५ जखमी; लग्नासाठी जाताना घडली दुर्घटना

नाणीज येथे ट्रक-कार अपघातात १ ठार, ५ जखमी; लग्नासाठी जाताना घडली दुर्घटना

रत्नागिरी : लग्नासाठी जाणाऱ्या कारची समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात वृद्धा ठार झाली असून, ५ जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर नाणीज जवळील इरमलवाडी येथे आज, शुक्रवारी  दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय-७०, रा. वाडावेसवरांड, फनसवणे (भंडारवाडी)) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

तर हरिश्चंद्र वारंग (वय-६५), हर्षदा हरिश्चंद्र वारंग (६०), विक्रांत हरिश्चंद्र वारंग (३०), सुनील पेडणेकर (५५), सुषमा सुनील पेडणेकर (५०, सर्व रा. खारघर, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील (३८, रा. उंब्रज ता. इंडी, जि. विजापूर) हा जयगडहून ट्रक (एमएच ०९, सीए ३१२४) घेऊन सोलापूरला निघाला होता. दरम्यान, नाणीज येथील इरमलवाडी वाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०१, डीपी २६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली आहे. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी चाललेले होते.

या अपघाताची माहिती नाणीज येथे समजताच तरुणांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. याच वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय दाखल केले. अधिक तपास पाली पोलिस स्थानकाचे हवालदार मोहन कांबळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: 1 killed, 5 injured in truck car accident near Nanij on Ratnagiri Kolhapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.