Weekly horoscope - December 9 to December 14, 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2019
आठवड्याचे राशीभविष्य - 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2019

मेष - ह्या आठवड्यात व्यावसायिक व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी नव्या लोकांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आनंदाच्या क्षणी जुने मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपला आनंद द्विगुणित होईल. मात्र, आपणास प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः आपल्या शक्तीपेक्षा अधिक काम करू नये, तसेच अतिरिक्त वजन उचलू नये, अन्यथा कंबरदुखी किंवा मणक्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ - आठवड्याच्या सुरवातीस आपणास थोडी बेचैनी जाणवेल. हा आठवडा प्रवासासाठी अनुकूल नाही. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पोटाचे विकार, त्वचा विकार संभवतात. कौटुंबिक समस्यांत आपणास व्यस्त राहावे लागेल. नवीन संबंध त्रासदायी ठरण्याच्या शक्यतेमुळे सध्या कोणाचीही भेट टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन - वडीलधाऱ्या व्यक्तींसह आपला आठवडा चांगला जाईल, मात्र वैवाहिक जोडीदाराशी आपले संबंध सामान्यच राहतील. प्रणयी जीवनात विशेष काही घडण्याची शक्यता नसून आपल्या प्रियकराशी / प्रेमिकेशी संवाद साधताना काळजी न घेतल्यास गैरसमजुतीने कटुता निर्माण होऊ शकते. कौटुंबिक सुख - शांती लाभेल. प्राप्तीत मोठी वाढ होईल व नियमित प्राप्ती व्यतिरिक्त अन्य काही लाभ मिळू शकतील. आणखी वाचा

कर्क - आठवड्याच्या सुरवातीस आपणास तजेला जाणवेल. आपल्या मनात कारकिर्दीच्या प्रगतीस प्राधान्यक्रम असेल. त्याच बरोबर कौटुंबिक वातावरण सौहार्दाचे राहील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अपेक्षित यश मिळेल, परंतु मेहनतीस पर्याय नसल्याचे सुद्धा त्यांना लक्षात ठेवावे लागेल. दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या योजना पूर्ण होतील. व्यापारी व नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूलतेचा असल्याने हाती घेतलेले प्रकल्प सहजतेने पूर्ण होतील. आणखी वाचा

सिंह - आठवड्याच्या सुरवातीस दीर्घ काळानंतर झालेल्या जुन्या मित्र भेटीने आपल्या बालपणातील स्मृती ताज्या होतील. कार्यात यशस्वी झाल्याने आपल्या प्राप्तीत वाढ तर होईलच त्याच बरोबर समाजात, व्यापारी वर्गात, कार्यालयात व घरात आपल्या मान - प्रतिष्ठेत सुद्धा वाढ होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. आणखी वाचा

कन्या - आठवड्याच्या सुरवातीस आपल्या अहंकारामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. मन काहीसे व्याकुळ सुद्धा होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकणार नाही. अनैतिक प्रवृतींपासून दूर राहावे. थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल. छातीत दुखणे किंवा इतर आरोग्य विषयक त्रास होतील. आठवड्याच्या मध्या पासून पुन्हा परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. आणखी वाचा

तूळ - सध्या आपण सुख - सोयीच्या साधनांची जमवाजमव कराल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. आपली सुषुप्त इच्छा पूर्ण होईल. आठवड्याच्या मध्यास आपणास थकवा जाणवेल. परंतु थोडा वेळ विश्रांतीसाठी व मनोरंजनासाठी काढून आपण नवीन उत्साहाने पुन्हा प्रगतीपथावर मार्गक्रमण कराल. आणखी वाचा

वृश्चिक - व्यावसायिक आघाडीवर आपली सुरवात चांगली होईल. वाणीमुळे काहीवेळा कामात अडथळे निर्माण होतील, परंतु आपण ते दूर करण्याचे उपाय सुद्धा शोधून काढाल हि एक चांगली बाब असेल. मनात उत्साहासह आपण जोम व जोश टिकवून ठेवू शकाल. आठवड्याच्या पूर्वार्धात आपण स्वतःच्या आवडत्या विषयात प्रगती साधाल. आणखी वाचा

धनु - जमीन, घर, वाहन इत्यादी संबंधित महत्वाच्या दस्तावेजांना अंतिम स्वरूप देण्यासाठी अनुकूलता लाभेल. काही नकारात्मक विचारांनी मन विचलित होईल तेव्हा अशा विचारांपासून दूर राहून धार्मिक गोष्टींकडे आपण विशेष लक्ष द्यावे, जेणे करून मनास शांतता व स्थैर्य लाभेल. संबंधाच्या बाबतीत आपण कल्पना विश्वात रमून जाल. प्रणयी जीवनात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा

मकर - आठवड्याच्या सुरवातीस आपण कुटुंबियांसह अधिक वेळ घालवाल. वडिलधाऱ्यांचे आपणास सहकार्य लाभेल. आपले मन प्रसन्न राहील. कुटुंबियांना आनंदात ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या खुशीसाठी किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सढळ हस्ते खर्च कराल. त्यासाठी एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी होण्याची शक्यता सुद्धा आहे. दूरवर राहणारे मित्र किंवा स्नेहीजनांच्या संपर्कांमुळे किंवा निरोपामुळे आपला फायदा होऊ शकेल. आणखी वाचा

कुंभ - कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात निकाल येण्याची शक्यता आहे. सध्या आपण व्यावसायिक बाबीत अधिक व्यस्त राहिल्याने त्यात फायदा होण्याची दाट शक्यता आहे. संयमित वाणी व वागणुकीतील पारदर्शकता आपणास कारकिर्दीत नवीन उंची पर्यंत घेऊन जाऊ शकेल. गृहोपयोगी वस्तूंसाठी अतिरिक्त खर्च होईल. आपल्या आत्मविश्वासात व निर्णयशक्तीत वाढ होईल. आणखी वाचा

मीन - ह्या आठवड्याचे ग्रहमान बघता आपण कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवू शकाल असे दिसते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी महत्वाची चर्चा होऊ शकेल. आपण आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊन कार्यात पुढे मार्गक्रमण करू शकाल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. मात्र, धावपळीमुळे पित्त प्रकोप, पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास किंवा भोजनातील अनियमितेमुळे पोटाचे विकार संभवतात. आणखी वाचा
 

Web Title: Weekly horoscope - December 9 to December 14, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.