Today's Zodiac Sign, Horoscope for February 19, 2021 | राशीभविष्य १९ फेब्रुवारी २०२१, संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

राशीभविष्य १९ फेब्रुवारी २०२१, संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा

मेष - दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साही राहाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. आणखी वाचा  

वृषभ - कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. आईशी मनमोकळेपणा वाढेल तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. आणखी वाचा  

मिथुन - कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. कामाचा व्याप वाढल्याने तब्बेतीची कुरकुर वाढेल. आणखी वाचा  

कर्क - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. तब्बेत बिघडू शकते. संताप वाढेल. आणखी वाचा  

सिंह - आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.  आणखी वाचा  

कन्या - आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत. आणखी वाचा  

तूळ - आज दिवसाची सुरुवात आनंददायक असेल असे श्रीगणेश सांगतात. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. आणखी वाचा  

वृश्चिक - बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. असे श्रीगणेश सांगतात. जवळचा प्रवास घडेल. धन विषयक आराखडा बनविण्यासाठी वेळ शुभ आहे.  आणखी वाचा  

धनू - शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. सहल प्रवास शक्यतो टाळा. दुपारनंतर अनुकूल वातावरण.  आणखी वाचा  

मकर - आज आपण फारच संवेदनशील राहाल असे श्रीगणेश सांगतात. भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. आणखी वाचा  

कुंभ - महत्त्वाच्या कामाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. आणखी वाचा  

मीन -  स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयाचा विचार करण्याची सूचना गणेशजी देत आहेत. घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's Zodiac Sign, Horoscope for February 19, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.