Today's horoscope - September 19, 2020 | आजचे राशीभविष्य -१९ सप्टेंबर २०२०, आर्थिक लाभ होतील, वादविवाद टाळा

आजचे राशीभविष्य -१९ सप्टेंबर २०२०, आर्थिक लाभ होतील, वादविवाद टाळा

मेष -  व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. आणखी वाचा 

वृषभ -  आज बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. आणखी वाचा 

मिथून -  आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल.  आणखी वाचा 

कर्क -  अविचाराने कोणतेही कार्य न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल.  आणखी वाचा 

सिंह -  आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा असे श्रीगणेश सुचवितात. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. आणखी वाचा 

कन्या -  आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल, असे श्रीगणेश सांगतात. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. आणखी वाचा 

तूळ -  संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. आणखी वाचा 

वृश्चिक -   जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. आणखी वाचा 

धनु - श्रीगणेश कृपेने आज आपली कामाची योजना व्यवस्थित पूर्ण होईल. व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. आणखी वाचा 

मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. आणखी वाचा 

कुंभ - नव्या कामाची सुरुवात आज करू नका असे श्रीगणेश सांगतात. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. आणखी वाचा 

मीन - व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. असे श्रीगणेश सांगतात. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल.  आणखी वाचा 

English summary :
Today's horoscope, Zodiac Sign, Astrology - September 19, 2020

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - September 19, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.