आजचे राशीभविष्य - 16 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:04 IST2019-09-16T07:04:46+5:302019-09-16T07:04:58+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 16 सप्टेंबर 2019
मेष - आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाईल असे गणेशजी सांगतात. ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदाचे सुखद क्षण प्राप्त कराल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. सहकारी आणि वरिष्ठ अदिकार्यांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक दृष्टीने मान- मरातब वाढेल. आणखी वाचा
कर्क -आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा
सिंह- आज खूप जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबातील सर्वांशी संयमाने वागा. आणखी वाचा
कन्या - सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा
तूळ - घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कामात यशप्राप्ती होईल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. आणखी वाचा
धनु - आज मनात औदासिन्य पसरेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. कुटुंबीयांबरोबर ताण तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित राहील. आणखी वाचा
मकर - नवीन कार्य हाती घेण्यास शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि लाभही होतील. आणखी वाचा
कुंभ - आज कोणाशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होईल आणि निराशा येईल आणखी वाचा
मीन - आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा