आजचे राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२१;...म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 07:17 AM2021-10-14T07:17:30+5:302021-10-14T07:17:51+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - October 14, 2021; so don't make any important decisions today | आजचे राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२१;...म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

आजचे राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२१;...म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकार्‍याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी संबंधी कामासाठी प्रवास घडेल. काम वाढेल. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. दूरवरच्या मित्रांच्या शुभवार्ता समजतील. परदेश जाण्याचे योग येऊ शकतात. अधिक वाचा

मिथुन - आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा असे श्रीगणेशजी सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आजार्‍याने नवीन इलाज सुरु करु नका. कामवृत्तीवर संयम ठेवा. खर्च अधिक होऊ शकतो. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणय विषयक यश मिळेल. स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुखाचे योग आहेत. अधिक वाचा

सिंह - संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. माहेरहून चिंता वाढविणार्‍या बातम्या मिळतील. आज उदासीनता व साशंकता जास्त राहील. त्यामुळे मन उदास राहील. अधिक वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहा. प्रिय व्यक्ती भेटतील अधिक वाचा

तूळ - आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. जास्त हळवे बनाल. मनात उठणार्‍या विचारतरंगांमुळे त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. प्रवासासाठी प्रतिकूल दिवस. पाण्यापासून जपा. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्‍यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा व भाग्योदयाचे योग आहेत. भावा- बहिणींकडून लाभ होतील. अधिक वाचा

धनु - मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. द्विधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. असे श्रीगणेश सांगतात. दूर राहणार्‍या नातलगांकडून संदेश व्यवहार होतील. अधिक वाचा

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा. धडपडणार नाही याची दक्षता घ्या. अधिक वाचा

कुंभ - पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप करू नका. अधिक वाचा

मीन - श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. अधिक वाचा

Web Title: Today's horoscope - October 14, 2021; so don't make any important decisions today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app