आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 22:35 IST2020-11-08T22:30:40+5:302020-11-08T22:35:02+5:30

Todays Horoscope ९ November 2020 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Today's horoscope - November 9, 2020; People of this zodiac sign should be careful | आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

मेष -  आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल.   आणखी वाचा. 

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल.  आणखी वाचा. 

मिथुन -  नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला असे श्रीगणेश सांगत आहेत. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही.  आणखी वाचा. 

कर्क -  भावनेच्या भरात वाहून जाऊ नका अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. आणखी वाचा. 

सिंह -  कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सुचवितात. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल.  आणखी वाचा. 

कन्या -  आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील.  आणखी वाचा. 

तूळ - गणेशजी सांगतात की, आज कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत प्रेमाची वागणूक राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. मानसिक स्वास्थ वाढेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक नियोजन नीट होईल. आरोग्यही चांगले राहील. संततीसुख मिळेल.  

वृश्चिक - आज भाग्योदयाचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता.  आणखी वाचा. 

धनु -  आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल असे श्रीगणेश सांगतात. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक.  आणखी वाचा. 

मकर -  आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल.   आणखी वाचा. 

कुंभ -  श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल.   आणखी वाचा. 

मीन -  आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका.  आणखी वाचा. 

Web Title: Today's horoscope - November 9, 2020; People of this zodiac sign should be careful