आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2020, सर्वांसमोर अपमान होणार नाही, याची काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 07:16 IST2020-11-18T22:30:00+5:302020-11-19T07:16:59+5:30
Todays Horoscope 19 november 2020 : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2020, सर्वांसमोर अपमान होणार नाही, याची काळजी घ्या
मेष - हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अन्यथा आळस आणि दुःख वाढेल. आणखी वाचा
वृषभ - सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल. मनातही काळजी राहील. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. आणखी वाचा
कर्क - खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत. व्यावसायिकांना दिवस लाभप्रद. कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल. आणखी वाचा
सिंह - साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. आणखी वाचा
कन्या - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आईची तब्बेत बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी अनुकूल आहे. अध्यात्मिक विषय आणि गुढ रहस्यांमध्ये आकर्षण राहिल. मध्यान्हानंतर स्फूर्ती आणि प्रसन्नतेचा अभाव राहिल. घरात क्लेशदायक वातावरण राहिल. सर्वांसमोर अपमान होणार नाही, याची काळजी घ्या.
वृश्चिक -गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. आणखी वाचा
धनु - आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. कोणा स्नेह्याकडे मंगल कार्यानिमित्त जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. आणखी वाचा
मकर - कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. अपरिचितांशी परिचय होतील. आणखी वाचा
मीन -आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात. वरिष्ठांकडून व्यवसायात लाभ होतील. पदोन्नती मिळेल. व्यापारविषयक नियोजन कराल. आणखी वाचा