आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:24 AM2021-07-25T07:24:29+5:302021-07-25T07:26:22+5:30

horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी

Today's horoscope, July 25, 2021 | आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग

आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग

Next

मेष -  श्रीगणेश सांगतात की आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दया संबंधी उच्च अधिकार्‍यांसमवेत विचार- विनिमय होईल. आणखी वाचा 

वृषभ -  विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. आणखी वाचा

मिथुन -  श्रीगणेश सावधानतेचा इशारा देताना सांगतात की संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी, शस्त्रक्रिया आज करू नका. मितभाषा राहून मतभेद दूर करू शकाल. आणखी वाचा 

कर्क -  संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज- मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इ. खरेदी होईल. दांपत्यजीवन चांगले राहील. आणखी वाचा 

सिंह -  श्रीगणेश सांगतात की उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च उद्भवतील. आणखी वाचा 

तूळ -  आज सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. आणखी वाचा 

वृश्चिक -  कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग असल्याचे श्रीगणेश सांगतात. भावंडांशी कौटुंबिक चर्चा आणि नियोजन होईल. तन- मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. आणखी वाचा 

धनु -  सावधानतेचा इशारा देताना श्रीगणेश सांगतात की कुटुंबातील व्यक्तींशी होणार्‍या गैरसमजा पासून बचाव करा. नाहक खर्च होईल. मानसिक उलघाल आणि द्विधा स्थिती यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा 

मकर - आजच्या दिवसाचा श्रीगणेश ईश्वरभक्ती आणि पूजा पाठ याने करावा. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल.  आणखी वाचा 

कुंभ -   पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. तब्बेती विषयी समस्या उद्भवतील. आणखी वाचा 

मीन -  समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारे आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope, July 25, 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.