आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२१; ठरवलेलं काम सहजरित्या पूर्ण कराल, धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:26 AM2021-07-23T07:26:08+5:302021-07-23T07:26:19+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Todays horoscope July 23 2021 know what you rashi says rashibhavishya | आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२१; ठरवलेलं काम सहजरित्या पूर्ण कराल, धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती

आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२१; ठरवलेलं काम सहजरित्या पूर्ण कराल, धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल. अधिक वाचा

वृषभ - हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही. यात्रा- प्रवासात विघ्ने येतील. अधिक वाचा

मिथुन - श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने आणि वाहन खरेदीचे योग आहेत. अधिक वाचा

कर्क - आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता आणि यश मिळेल. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीशी झालेली भेट सुखद ठरेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. अधिक वाचा

कन्या - आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल. आपल्याच लोकांशी खटके उडतील व मतभेद निर्माण होतील. अधिक वाचा

तूळ - नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या धार्मिक स्थानी प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या वार्ता येतील. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. अधिक वाचा

धनु - श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग आणि मित्रांच्या भेटीने आनंद होईल. अधिक वाचा

मकर - तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू सतावून सोडेल. डाव्या डोळ्याचा त्रास होईल. अधिक वाचा

कुंभ - मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील. गृहस्थजीवन आणि दांपत्यजीवन यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. अधिक वाचा

मीन - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होतील आणि परिवारात आनंद पसरेल. अधिक वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays horoscope July 23 2021 know what you rashi says rashibhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app