शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आजचे राशीभविष्य - 20 जानेवारी 2021 : परदेशातून लाभदायक वार्ता मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:29 IST

Todays Horoscope 20 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष 

आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. पण दुपारनंतर मात्र हर प्रकारे आपणाला संयमाने व्यवहार करावा लागेल.

वृषभ 

व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. व्यवसायाच्या ठिकाणी सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल.

मिथुन 

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. दुपारनंतर घरातील वातावरण सुख आणि शांती देणारे असेल. त्यामुळे माननसिक दृष्ट्या ताजेतवाने राहाल.

कर्क 

आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आईची तब्बेत बिघडू शकते. वैचारिक पातळीवर विचलित न होण्याचा सल्ला.

सिंह 

नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. दुपारनंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल.

कन्या 

कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. अन्यथा कोणाशी मतभेद होऊ शकतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील.

तूळ

शारीरीक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करण्यावर जास्त खर्च होऊ शकतो. दुपारनंतर मन थोडे उदास असेल. कुटुंबातील सदस्यांसह मतभेद होतील. आज महत्त्वाचे निर्णय घेणं टाळा. 

वृश्चिक 

अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात जपून राहा. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल.

धनु 

आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. मान- सन्मान व उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात लाभाची शक्यता. अपघातापासून जपा. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल.

मकर 

स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. बढतीचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कुंभ 

आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. धार्मिक स्थळी यात्रा होण्याचे संकेत आहेत. दुपारनंतर व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

मीन 

कोणाशी वादविवाद किंवा बांडण करू नका. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. सुखमय बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूल काळ आहे. बौद्धिक दृष्ट्या लेखन कार्यात सक्रीय भाग घ्याल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य