Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 January 2021 | आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव

आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव


मेष - श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी चांगला दिवस आहे. आणखी वाचा

वृषभ - मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वाकचातुर्य आज तुमचे काम यशस्वी करेल व दुसर्‍याला मोहून टाकेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र नातलग यांच्याबरोबर उत्तम जेवणाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ मिळेल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कर्क - शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव आहे. आणखी वाचा

कन्या - नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळ- मेळ असेल. आणखी वाचा

तूळ - दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरीही संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. दुर्घटनेपासून दूर राहा. आणखी वाचा

धनु - बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. भागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृघराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. आणखी वाचा

कुंभ - आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील. आणखी वाचा

मीन - शारीरिक व मानसिक भय वाटेल. कुटुंबियांबरोबर वाद-विवाद होईल. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच वाणी यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 January 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.