आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 07:34 IST2019-01-06T07:34:05+5:302019-01-06T07:34:48+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2019
मेष
आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल.
वृषभ
आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात.
मिथुन
आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल.
कर्क
आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामावर खर्च होईल.
सिंह
आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल.
कन्या
आजचा दिवस आपणाला चांगला नाही. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
तूळ
आज भाग्योदय होईल. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास शुभ दिवस आहे.
वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. त्यामुळे कुटुंबात सुख- शांति राहील. विचारांवर नकारात्मक पगडा पडेल.
धनु
निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल.
मकर
आज मन अस्वस्थ राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही.
कुंभ
आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल . नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे.
मीन
आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल.