राशीभविष्य- कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवावा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 23:43 IST2021-01-04T21:21:33+5:302021-01-04T23:43:42+5:30

Todays Horoscope 5 January 2021 : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Todays Horoscope 5 January 2021 | राशीभविष्य- कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवावा, अन्यथा...

राशीभविष्य- कुंभ राशीच्या व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवावा, अन्यथा...

मेष 

आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल... आणखी वाचा

वृषभ 

विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन- लेखनात रस घ्याल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस... आणखी वाचा

मिथुन 

महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने तब्बेत बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा... आणखी वाचा

कर्क 

कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल... आणखी वाचा 

सिंह 

दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आयोजन आणि अतिविचार संकट निर्माण करतील... आणखी वाचा

कन्या 

वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस. तब्बेत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. आप्तेष्टांशी सुसंवाद साधाल... आणखी वाचा

तूळ

आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. मन शांत ठेवा.

वृश्चिक 

गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुलाकडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. विवाहयोग येतील. नोकरी धंद्यात संधी मिळून उत्पन्न वाढेल. मित्रां- सोबत सहलीला जाल... आणखी वाचा

धनु 

आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे. कामे व्यवस्थित पूर्ण होतील. परोपकाराची भावना आज प्रबळ राहील. दिवस आनंदात जाईल... आणखी वाचा

मकर 

आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. लेखन व साहित्य यात सृजनात्मकता प्रकट होईल. मनाच्या एखाद्या कोपर्‍यात मात्र अस्वस्थता जाणवेल... आणखी वाचा

कुंभ 

नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबात मतभेद व भांडण होण्याची शक्यता आहे. तब्बेत बिघडेल. दुर्घटनेपासून जपा... आणखी वाचा

मीन 

आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. मित्र, स्वकीय यांच्याशी भेट होईल. प्रेमिकांचा रोमान्स गाढ बनेल... आणखी वाचा

Web Title: Todays Horoscope 5 January 2021