आजचे राशीभविष्य - 3 ऑगस्ट 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 08:12 IST2018-08-03T08:10:29+5:302018-08-03T08:12:12+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस?... जाणून घ्या

todays horoscope 3rd august 2018 | आजचे राशीभविष्य - 3 ऑगस्ट 2018

आजचे राशीभविष्य - 3 ऑगस्ट 2018

मेष

कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. चित्ताची एकाग्रता कमी राहील... आणखी वाचा

वृषभ 

घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल... आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल... आणखी वाचा

कर्क

वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा, असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील... आणखी वाचा

सिंह

आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील... आणखी वाचा

कन्या

सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल... आणखी वाचा

तूळ

आज दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेशाचा आशीर्वाद आहे. गृहस्थी जीवनात सुख- शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य राहील... आणखी वाचा

वृश्चिक

मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल... आणखी वाचा

धनु 

कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे... आणखी वाचा

मकर 

महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल... आणखी वाचा

कुंभ

आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा... आणखी वाचा

मीन

आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे... आणखी वाचा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: todays horoscope 3rd august 2018