आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 07:22 IST2019-08-29T07:22:04+5:302019-08-29T07:22:24+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope 29 August 2019 | आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2019

आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2019

मेष
मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आणखी वाचा

वृषभ
आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. आणखी वाचा

मिथुन
काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा

कर्क
मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. आणखी वाचा

सिंह
खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. आणखी वाचा

कन्या
वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. आणखी वाचा

वृश्चिक
नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणखी वाचा

धनु
आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल.  आणखी वाचा

मकर
आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल.  आणखी वाचा

कुंभ
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. आणखी वाचा

मीन
आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 29 August 2019