आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:58 AM2020-09-25T06:58:01+5:302020-09-25T06:58:26+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 25 September 2020 | आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस

Next

मेष
आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. धार्मिक व मंगल कार्याला उपस्थिती लावाल. आणखी वाचा

वृषभ
हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल. नवीन काम सुरू करायला वेळ योग्य नाही. आणखी वाचा

मिथुन
आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने आणि वाहन खरेदीचे योग आहेत.  आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता आणि यश मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा

सिंह
आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीशी झालेली भेट सुखद ठरेल. आणखी वाचा

कन्या
आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची तब्बेत बिघडेल. आपल्याच लोकांशी खटके उडतील व मतभेद निर्माण होतील.  आणखी वाचा

तूळ
भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या धार्मिक स्थानी प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या वार्ता येतील. आणखी वाचा

वृश्चिक
नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. अलंकार आणि सुगंधी पदार्थांची खरेदी कराल. आपल्या वाणीचा प्रभाव इतरांना मोहीत करेल. आणखी वाचा

धनु
संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून धार्मिक व मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग आणि मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा

मकर
तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल. आध्यात्मिक व धार्मिक व्यवहार वाढतील. शत्रू सतावून सोडेल. आणखी वाचा

कुंभ
मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील. गृहस्थजीवन आणि दांपत्यजीवन यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. आणखी वाचा

मीन
नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होतील आणि परिवारात आनंद पसरेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 25 September 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.